Wheat Farming : मान्सून 2024 मध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रात चांगला दमदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतरही अनेक राज्यांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून कालावधीत राज्यातील मध्य महाराष्ट्रात सहित सर्वच विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
यामध्ये सर्वात जास्त पाऊस मध्य महाराष्ट्र विभागात झाला आहे. कोकण मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिकच राहिले आहेत. तथापि पावसाचे असमान वितरण हा एक चिंतेचा विषय नक्कीच आहे.
मात्र यंदा गेल्या वर्षी सारखी दुष्काळजन्य परिस्थिती नाहीये. यामुळे या वर्षी रब्बी हंगामात गहू लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा अंदाज समोर येतोय.
अशा परिस्थितीत जर तुम्हीही यंदाच्या रब्बी हंगामात गहू लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एका सुधारित गव्हाच्या जातीची माहिती सांगणार आहोत. आज आपण HI 1655 अर्थातच पुसा हर्षा या जातीची माहिती पाहणार आहोत.
गव्हाच्या ‘या’ वाणाची लागवड करा, हेक्टरी 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार ! Wheat Farming
एचआय 1655 (पुसा हर्षा) जातीच्या विशेषता खालील प्रमाणे
कमी पाण्यात अधिक उत्पादन.
तापमान वाढीस सहनशील.
दुष्काळ प्रतिरोधक, गव्हाची H.I 1655 (पुसा हर्षा – 1655) ही जात देशाच्या मध्यवर्ती भागात वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत आहे.
हा वाण चपाती, ब्रेड आणि बिस्किटांसाठी सर्वोत्तम आहे.
या जातीची पेरणी करण्यासाठी एकरी 40 kg बियाणे वापरावे.
20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर हा काळ या वाणाची पेरणी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे.
गव्हाचा हा एक सरबत्ती वाण आहे.
या जातीच्या गव्हाची उंची ही 90 ते 95 सेंटीमीटर च्या आसपास असते.
दव अर्थातच दड आणि अधिक थंडी सुद्धा या वाणाचे फारसे नुकसान करत नाही.
ही जात देठ आणि पानांच्या तांबेरा रोगास प्रतिरोधक आहे.
धान्य जाड, चमकदार, आकर्षक, लांब, रंग अंबर (सोनेरी) असतो.
या वाणाच्या गव्हाच्या 1000 दाण्यांचे वजन सुमारे 47 ग्रॅम भरते. यात प्रथिने (11.4%), जस्त (39.7), लोह (37.3) पीपीएम एवढे आहे.
या जातीचा पीक परिपक्व कालावधी 115 ते 120 दिवस एवढा आहे.
गव्हाच्या या जातीला तीन ते चारदा पाणी भरल्यानंतर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.