Cotton Rate in marathi: महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. दहा दिवसानंतर विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मोठा सण साजरा होईल. दसरा साजरा झाला की खरीप हंगामातील बहुतांशी पिकांची काढणी ही अंतिम टप्प्यात येत असते. नंतर रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होते.
दसऱ्यानंतर सोयाबीन आणि कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. कापसाची आवक खऱ्या अर्थाने ही विजयादशमीनंतरच वाढते. गेल्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी राज्यातील काही बाजारांमध्ये नवीन कापूस चमकला होता.
मात्र नव्या कापसाची आवक फारच कमी होती. पण आता विजयादशमीनंतर नव्या कापसाची आवक वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून यंदा जेव्हा कापसाची आवक वाढेल म्हणजेच विजयादशमी नंतर कापसाला काय दर मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आता आपण विजयादशमी नंतर कापूस
बाजाराची स्थिती नेमकी कशी राहू शकते
या संदर्भात अभ्यासकांनी काय अंदाज दिला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
विजयादशमी नंतर कापसाला काय दर मिळणार? (Cotton Rate in marathi)
सध्या राज्यातील काही बाजारांमध्ये कापसाला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळतोय. परंतु बाजारभाव हे आठ हजार रुपयांच्या खालीच आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना कापसाला किमान दहा हजाराचा भाव मिळायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या मते कापूस पीक उत्पादित करण्यासाठी लागणारा उत्पादन खर्च पाहता कापसाला किमान दहा हजाराचा दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र सध्या कोणत्याही बाजारात कापसाचे बाजार भाव दहा हजाराच्या आसपास नाहीत.
बाजार अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे यंदा कापूस बाजार भाव हे दहा हजाराला टच करण्याची शक्यता नाही. बाजार अभ्यासकांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात यंदा कापसाला 7500 ते 8500 या दरम्यान बाजार भाव मिळू शकतो असे म्हटले आहे.