पित्त झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये हे जाणून घ्यायचे आहे? तर तुम्ही एकदम अचूक ठिकाणी आलेला आहात कारण या लेखात पित्त बद्दल संपूर्ण माहिती जसे कि घरगुती उपाय व औषध सांगितले आहे.
आपण आपल्या नियमित आयुष्यात विविध प्रकारचे खाद्य खात असतो मात्र नकळत हे आपल्या शरीरातील आम्ल वाढवत असतात जेणेकरून तुम्हाला पित्त होऊ शकते.
पित्त झाल्यावर काय खावे?
जर तुम्हाला वारंवार छातीत जळजळ, फुगणे, अजीर्ण किंवा पित्त असल्याची भावना येत असेल तर तुमच्या डायटवर लक्ष देण्याची वेळ आली आहे. कारण आपण काय खातो या मुळे देखील पित्त होऊ शकते.
रिफ्लक्स व पित्त टाळण्यासाठी आपल्या आहारात बदल करणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. कमी आम्लयुक्त आणि जास्त अल्कधर्मी अन्न खाल्ल्याने तुमच्या अन्ननलिकेमध्ये आम्लाचा बॅकफ्लो कमी होण्यास मदत होते.
पित्त झाल्यावर खालील पदार्थांचे सेवन करावे:
- पालक, मेथी, भेंडी, काकडी, बीटरूट, गाजर, ब्रोकोली, कोबी, धणे, फ्लॉवर, रताळे, वांगी, कांदा, मटार, भोपळा आणि मुळा यासह बहुतेक भाज्या (हिरव्या किंवा अन्यथा).
- बहुतेक फळे, विशेषतः केळी, सफरचंद, टरबूज, अंजीर आणि डाळिंब.
- साधे दही, लोणचे, इडली.
- बीन्स, हिरवे बीन्स, नेव्ही बीन्स, ब्रॉड बीन्स, मोड आलेले मूग, लिमा बीन्स, पिंटो बीन्स आणि मसूर.
- नट आणि बिया, जसे की बदाम, भोपळ्याच्या बिया, अंबाडीच्या बिया, चिया सीड्स, तीळ आणि सूर्यफूल बिया.
पित्त झाल्यावर काय खाऊ नये?
पित्त झाल्यावर तुमच्या आहारातील पित्त निर्माण करणारे पदार्थ ओळखणे आणि ते काढून टाकणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा भरपूर चरबीयुक्त पदार्थ पित्त वाढवतात. यात समाविष्ट आहेत :
- तळलेले स्वादिष्ट पदार्थ (पुरी, पापड, बटाटा वडा आणि समोसा)
- चरबीयुक्त मिठाई (लाडू, बर्फी, जिलेबी आणि शीरा)
- तेलकट पदार्थ (लोणचे आणि तेलावर आधारित ड्रेसिंग)
पुढील ओळीत मसालेदार पदार्थ आहेत जे तुमच्या पोटाच्या भिंतीला त्रास देतात आणि छातीत जळजळ करतात, जसे की:
- गरम मसाला आणि तडका डाळ घालून सब्जी
- पाणीपुरी, भेळ पुरी, पापडी चाट आणि आलू टिक्की यासह चाटची तयारी
- भरपूर मिरची पावडर असलेले पदार्थ, जसे की मसालेदार लोणचे आणि चटण्या
पित्त म्हणजे काय?
आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की मनुष्यामध्ये तीन दोष असतात जे सम्पूर्ण शरीराच्या सुरळीत वाटचालीसाठी महत्वपूर्ण असतात. हे तीन दोष म्हणजे वात, पित्त व कफ जेंव्हा हे तिनही दोष सुरळीत असतात तेंव्हा आशा माणसाला आयुर्वेदामध्ये निरोगी समजले जाते.
यातील पित्त म्हणजे अग्नी किंवा उष्णता होय, पित्ता मध्ये महाभूतांपैकील अग्नी चा समावेश आहे.
जेंव्हा पोटातील आम्लता वाढते तेव्हा पोटातील अन्न अन्ननलिकेमार्फत पुन्हा कंठापर्यंत येते ह्या प्रक्रियेमुळे व आम्ल पदार्थामुळे छातीत जळजळ व डोखेदुखी होते ह्याला पित्त असे म्हणतात.
पित्त कशामुळे होते / पित्त होण्याची कारणे
पित्त होण्याची अनेक कारणे असू शकतात मात्र काही ठराविक कारणे आहेत जे नेहमीच कारणीभूत असतात.
- एकदाच खूप खाणे किंवा जेवल्याजेवल्या आडवे होणे,
- जास्त वजन किंवा लठ्ठपणा
झोपायच्या आधी काही खाणे (चिप्स,फरसाण इत्यादी), - आम्लता वाढवणारे पदार्थ खाणे ( लिंबू,टोमॅटो, चॉकोलेट, पुदिना,लसूण,कांदे किंवा तिखट पदार्थ)
- कारबन असलेले थंड पेये, दारू,
- कॉफी व चहा,
- धुम्रपान
- गरोदरपणात देखील पित्त होते
- काही औषधे देखील पित्त होण्यास
- कारणीभूत आहेत जशी की (Azithromycin,Combiflam etc)
- पोटातील आजार जसे अल्सर, गॅस्ट्रो-ऑइसोफेगल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) इत्यादी.
- खराब जीवनशैली जसे की जास्त ताण घेणे, कमी झोपणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे इत्यादी.
पित्त व आम्लपित्ताची लक्षणे (Symptoms of Acidity in marathi)
पित्त व आम्लपित्ताची लक्षणे आहेत:
- छातीत व गळ्याच्या भागात जळजळ होणे
- अपचन
- पोटात गॅस होणे
- बद्धकोष्ठता
- आंबट ढेकर येणे
- उलटी होतेय असे वाटणे
- तोंडातुन घाण वास येणे
पित्ताचे प्रकार काय आहेत?
पित्त कशामुळे होते व त्याची कारणे काय असतात यावरून पित्ताचे प्रकार ठरवले जातात. जे खालील प्रमाणे आहेत.
रिस्पायरेटरी ऍसिडोसिस पित्त
जेव्हा शरीर पुरेसे कार्बनडाय ऑक्साईड शरीरातून बाहेर काढण्यास असमर्थ होते व शरिरातील कार्बनची पातळी वाढते आणि त्यामुळे पोटातील ऍसिड देखील वाढते.
रिस्पायरेटरी ऍसिडोसिस पित्ताची लक्षणे
- शिंका येणे
- श्वास घेण्यात अडचण
- अस्वस्थ झोप
- रक्तातील ऑक्सिजनच्या कमी
- पातळीमुळे त्वचेवर निळे रंग
आहार-प्रेरित ऍसिडोसि पित्त
काही पदार्थ आणि पेय शरीरात आम्लता वाढवू शकतात. पदार्थांचा पीएच पोटातील आम्लता वाढवत नाहीत मात्र पदार्थ पचन होत असताना प्रक्रियेत आम्लता वाढू शकते.
औषधांपासून होणारे पित्त (डायट इंडुसेड ऍसिडोसिस)
काही औषधे शरीरात आम्लता वाढवू शकतात यामध्ये उदाहरणांचा समावेश आहे:
- बीटा-ब्लॉकर्स
- बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ औषधे, जसे की ट्रायमेथोप्रिम (प्रिमसोल)
- अँटीरेट्रोव्हायरल
- स्टॅटिन
रेनल ट्यूबुलर एसिडोसिस पित्त
मूत्रपिंडाचा रोग किंवा मूत्रपिंड निकामी झाल्यास मेटाबोलिक एसिडोसिस होऊ शकते, मूत्रपिंड शरीरातील जादा ऍसिड काढून टाकते जे शरीरातून मूत्रमार्गे निघून जाते. मूत्रपिंडात समस्या असल्यास, हे अवयव शरीरातून प्रभावीपणे एसिड काढण्यात अक्षम ठरतात.
पित्त झाल्यावर घरगुती उपाय
पित्त झाल्यावर अनेक घरगुती उपाय आहेत जे तुम्ही स्वतःहून करू शकता. तुम्हाला झालेल्या पित्तावर अवलंबून आहे कि तुम्हाला आराम मिळायला किती वेळ लागेल ते.
1. बडीशेप पावडर
बडीशेप पावडर नसल्यास तुम्ही एक चमचा बडीशेप बारीक ठेचून घ्यावा. एक चमचाभर बडीशेपची पावडर घेऊन एक ग्लासभर पाण्यात घालून पिल्याने छातीत होणारी जळजळ त्वरित कमी होते.
2. पपई
पपई मध्ये पॅपेन (Papain) नावाचे एंझाईम असतात जे पोटातील आम्लस्त्राव (Acid Secretion) रोखण्यास मदत करते. पित्त झाल्यावर एक ग्लास पपईचा ज्यूस प्यावा.
3.ओवा
ओवा शरीराची पाचन शक्ती वाढवतो ज्यामुळे अधिक खाल्लेलं अन्न पचनास मदत होते त्यासोबतच बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो व सोबतच पित्त देखील नाहीसे होते. एक चमचा ओवा किंवा ओव्याचे पाणी घेतल्याने पित्त कमी होते.
4. लवंग
लवंगाची एखादी तुकडी जरी तोंडात घेऊन चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे जशी की छातीतील जळजळ,उलटी व पोटातील त्रास लगेच कमी होतात.
5. केली
केली खाल्ल्याने पोटातील आम्लता कमी होते ज्यामुळे पित्त देखील कमी होते, पित्त वाढल्यावर दोन केली खाल्ल्यास त्वरीत आराम पडतो.
6. कलिंगडाचा रस
पोटाला एकदम थंडता देणारा रस म्हणजे कलिंगडाचा रस, एक ग्लासभर रस पिल्याने चांगलाच आराम पडेल सोबतच पचनशक्ती देखील वाढते.
7. बेकिंग सोडा
अर्धा चमचे बेकिंग सोडा अर्धा कप पाण्यात मिसळुन त्याचे सेवन केल्यास, एसिडिटी आणि छातीत जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळतो.
8. आले/अद्रक
कच्चे आले किंवा आल्याचा चहा पिल्याने पोटातील आम्लता कमी होते व पित्तापासून आराम मिळतो.
9. थंड दूध
हा सर्वात सोपा उपाय आहे, कॅल्शियममध्ये समृद्ध असल्याने थंड दूध आपल्या पोटात आम्लीयतेची पातळी कमी करते व आपल्याला पित्तापासून झटपट आराम देते.
10. नारळाचे पाणी
दररोज 2 कप नारळाचे पाणी पिल्याने पित्त कमी होते तसेच नारळात फायबर जास्त प्रमाणात असल्याने अन्न पचन देखील चांगले होते.
11. बदाम
बदाम नैसर्गिक तेलांमध्ये समृद्ध असल्याने आपल्या पोटात बदामांचा सुखद परिणाम होतो. कच्चे बदाम पचन प्रक्रियेस मदत करणारे म्हणून ओळखले जातात,तसेच तुम्ही बदामाचे दूध देखील घेऊ शकता.
12. ओट्स
ओट्स हे एक संपूर्ण धान्य आहे आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. जास्त फायबर असलेल्या आहाराचा अॅसिड रिफ्लक्सचा धोका कमी करण्यासाठी उपयोग केला जातो. इतर फायबर पर्यायांमध्ये संपूर्ण धान्य ब्रेड आणि चिया सीड्स यांचा समावेश होतो.
13. लिंबाचा रस आणि मध
लिंबाचा रस सामान्यतः खूप अम्लीय मानला जातो, परंतु लिंबाचा रस थोड्या प्रमाणात कोमट पाणी आणि मधात मिसळल्याने पोटातील आम्ल निष्प्रभावी होते. तसेच, मधामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असतात, जे पेशींच्या आरोग्याचे रक्षण करतात.
पित्त झाल्यावर घरगुती उपाय स्वागत तोडकर
पित्त झाल्यावर घरगुती उपाय – क्रमांक एक
- थोडेसे सुखे खोबरे घ्या व दोन ते तीन चमचे धनिया घ्या व त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्या व हे मिश्रण चावून चावून खाणे,
- कमीतकमी सात ते आठ दिवस तुम्ही हे मिश्रण खाणे आवश्यक आहे व ज्याचे पित्त जास्त आहे त्यांनी जास्त दिवस हा उपाय करावा.
- हे खाल्यानंतर पाच मिनिटांत तुमचे पित्त कमी झालेले तुम्हाला दिसून येईल.
पित्त झाल्यावर घरगुती उपाय – क्रमांक दोन
सुंठ घ्या व त्याची ठेचुन पूड तयार करा व थोडीसी साखर देखील घाला व थोडा ओलेपणा येईल एवढं पाणी घाला व एक चमचा सुंठेच्या पुडेची गोळी बनवून घ्या व त्याचे सेवन करा, हा एक पित्तावर रामबाण उपाय आहे.
पित्त झाल्यावर काय करावे?
- जीवनात सक्रिय रहा आणि आशा गोष्टी करत राहा ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यायाम होईल, जशे की पोहणे, सायकलिंग, डान्स किंवा आपला कोणताही आवडता खेळ.
- दिवसातून 4 ते 5 वेळा थोडे थोडे जेवण खा.
- जेवणानंतर लगेच झोपू नका
अंथरुणावर पडण्यापूर्वी किमान 2 तास आधी आपले जेवण खाऊन घ्या. - वजन जास्त किंवा लठ्ठपणा असल्यास वजन कमी करा
- धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळा
व्यायाम करणे
जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपण आपल्या सर्व महत्वाच्या अवयवांकडे रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि यात पोट देखील समाविष्ट आहे. जर पोटात अन्न असेल तर नियमितपणे व्यायाम करणार्या व्यक्तींना रक्तपुरवठा आणि पचन चांगले होते. खरं तर, नियमित व्यायाम करणार्या लोकांमध्ये पोटाची हालचाल नियमित आणि वेगवान असते.